निसर्ग
निसर्ग म्हणजे घन वनराई निसर्ग म्हणजे शांत निळाई
दाहकतेतून पान्थस्ताला निसर्ग अलगद स्वप्नी नेई
तलम धुक्यतुन एक सरिता निखळपणाने गीते गाई
वळणे घेऊन अवखळतेने मार्ग काढूनी पुढती जाई
कधी स्तब्धतो निसर्ग चंचल कधी बहरतो परी जादुई
कधी अवतरे तो रिमझीम तर कधी अचानक बरसुन जाई
निसर्ग असतो वसंत, शिशिर निसार्गभसतो यमन, मारवा
कधी ताळापतो उन्हासारखा कधी पसरतो गोड गारवा
इंद्रधनूच्या रांग रूपाने आजोड आकृती बनवून जाई
अवघी सृष्टी निसर्गाच्या कलाकारीने चकीत होई
कितीक रूपे कितीक व्याख्या अपुरी वाटे शब्दकमाई
तुझे दान ओंजळीत पडले ..असेल कदाचित आमाचीच पुण्याई!
-- ओंकार खरे
एक नंबर !!
ReplyDelete