An attempt to speak the truth..

An attempt to speak the truth..

Sunday, May 23, 2010

सखे


माळुनिया गजरा तुज केसात सोडला मी निश्वास 
स्वस्तात सुटलो आज .. आनंद मनी हा खास..

धडधडे छाती माझी...ऐकता भव्य स्वप्ने तुझी
बरी वाटतेस म्हणूनच मजला दिवसा जागेपणी

तुज शृंगराचा भाव पाहता फुटतो माजला घाम सखे  
नसता करशी यत्न कशाला पॉलीश करूनी  तुझी नखे

तव हौसेची पाहुनी भरारी मज कौतुकाचे शब्द येती
परी पाकिटाचे वजन बापुडे  वास्तवाचे भान देती

जमेल मलाही कधीतरीही तुझीच स्वप्ने पूर्णावाया 
साथ दे मज तोपर्यंत सल मनीची घालवाया

दोघे मिळुनी पूर्ण करूया अवास्तवाचे अशक्य कल्प 
समाधान मिळे या यत्नांत, आनंद नसे हा अल्प...

---ओंकार खरे