An attempt to speak the truth..

An attempt to speak the truth..

Sunday, January 25, 2009

भास

तू तशीच मीही तोच 
दुराव्याचा भास का? 
प्रिती तीच, बंध तेच 
तुटण्याचा भास का?....

प्रत्येकवेळी भेटताना उमटणारे शब्द तेच 
त्याच शब्दांना आता मौनाचे भास का?.....

सहजपणे गालावर उमटणारे हास्य तेच 
हास्यवेळी नयनाची पाणावली किनार का?.....

मैफलीत सुह्रुदांच्या भेटतो आनंद तोच 
गर्दीतही सुह्रुदांच्या विरहाचा भास का?....

नजरेत असती स्वप्ने रंगणारी रोजचीच 
त्याही स्वप्नांना आता विरण्याचे भास का?....

कल्पनेच्या पाखराला क्षितिजाचा ध्यास तोच 
वेदनेच्या कुंपणाचे पाखराला भास का?.....

जाणीव आहे बंधनाची, समजूत घालतो मनाची 
पण वेड्या या मनाला मीलनाचे भास का?....
ओंकार खरे

4 comments:

  1. जाणीव आहे बंधनाची, समजूत घालतो मनाची
    पण वेड्या या मनाला मीलनाचे भास का?....
    wonderful!!! takes me home

    ReplyDelete
  2. कल्पनेच्या पाखराला क्षितिजाचा ध्यास तोच
    वेदनेच्या कुंपणाचे पाखराला भास का?.....

    sunder......

    ReplyDelete