दुराव्याचा भास का?
प्रिती तीच, बंध तेच
तुटण्याचा भास का?....
प्रत्येकवेळी भेटताना उमटणारे शब्द तेच
त्याच शब्दांना आता मौनाचे भास का?.....
सहजपणे गालावर उमटणारे हास्य तेच
हास्यवेळी नयनाची पाणावली किनार का?.....
मैफलीत सुह्रुदांच्या भेटतो आनंद तोच
गर्दीतही सुह्रुदांच्या विरहाचा भास का?....
नजरेत असती स्वप्ने रंगणारी रोजचीच
त्याही स्वप्नांना आता विरण्याचे भास का?....
कल्पनेच्या पाखराला क्षितिजाचा ध्यास तोच
वेदनेच्या कुंपणाचे पाखराला भास का?.....
जाणीव आहे बंधनाची, समजूत घालतो मनाची
पण वेड्या या मनाला मीलनाचे भास का?....
ओंकार खरे
जाणीव आहे बंधनाची, समजूत घालतो मनाची
ReplyDeleteपण वेड्या या मनाला मीलनाचे भास का?....
wonderful!!! takes me home
कल्पनेच्या पाखराला क्षितिजाचा ध्यास तोच
ReplyDeleteवेदनेच्या कुंपणाचे पाखराला भास का?.....
sunder......
ek number
ReplyDeletebesshhhtttt!!!!!
ReplyDelete